Font Problem

       
 
 
 

बाळक्रीडा अभंग

 
 

५.
शिळा स्फटिकाची न पालटे भेदे । दाउनिया छंदे जैसी तैसी ॥१॥
जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावे ॥२॥
फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी मायबापा ॥३॥
मायबापा सोडविले बंदीहुनि । चाणूर मर्दुनी कंसादिक ॥४॥
आदिक नाही देणे अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्‍त केली ॥५॥
मुक्‍त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥
पाप कोठे राहे हरि आठविता । भक्‍ती द्वेषे चिंता जैसा तैसा ॥७॥
साक्षी तयापाशी पूर्वील कर्माच्या। बांधला सेवेच्या ऋणी देव ॥८॥
देव भोळा धांवे भक्‍ता पाठोवाटी । उच्चारिता कंठी मागेमागे ॥९॥
मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी। धावे तो घरासी भाविकांच्या ॥१०॥
४५१२ पृ ७४५(शासकीय), ३८१३ पृ ६५९(शिरवळकर)

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग