Font Problem

       
 
 
 

बाळक्रीडा अभंग

 
 

११
मने हरिरूपी गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥१॥
यांच्या भ्रतारांची धरूनिया रूपे । त्यांच्या  घरी त्यापे भोग करी ॥२॥
करी कवतुक त्याचे तयापरी । एका दिसे हरि एका लेक ॥३॥
एक भाव नाही सकळांच्या चित्ती । म्हणऊनि प्रीती तैसे रूप ॥४॥
रूप याचे आहे अवघेचि एक । परि कवतुक दाखविले ॥५॥
लेकरू न कळे स्थूल की लहान । खेळे नारायण कवतुके ॥६॥
कवतुक केले सोंग बहुरूप । तुका म्हणे बाप जगाचा हा ॥७॥
४५१८ पृ ७४८(शासकीय), ३८१९ पृ ६६२(शिरवळकर)
 

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग