Font Problem

       
 
 
 

बाळक्रीडा अभंग

 
 

९५
धरियेले रूप कृष्ण नाम बुंथी । परब्रम्ह क्षिती उतरले ॥१॥
उत्तम हे नाम राम कृष्ण जगी । तरावयालागी भवनदी ॥२॥
दिनानाथ ब्रिदे रुळती चरणी । वंदितील मुनी देव ॠषि ॥३॥
ॠषी मुनी भेटी दिली नारायणे । आणीक कारणे बहु केली ॥४॥
बहु कासावीस जाला भक्‍तांसाटी । तुका म्हणे आटी सोसियेली ॥५॥
४६०१ पृ ७७४ (शासकीय), ३९०३ पृ ६९१ (शिरवळकर)

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग