Font Problem

       
 
 

सूचना: गाथेच unicode font मध्ये टंकलेखानाच काम चालू आहे. टंकलेखन झालेले अभंग संकेतस्थळावर उपलब्ध होतील. हे सदर Internet Explorer मध्ये बघणे. इतर web-browsers मध्ये काही अक्षर किंवा शब्द नीट दिसत नाहीत.संपूर्ण गाथा पाहिजे असल्यास, पानाच्या शेवटी आपण download करू शकता.

 
 

पूर्व जन्म वृत्तान्त

 
 

१.

आम्ही वैकुंठवासी । आलो या चि कारणासी ।
बोलिले जे ॠषी । साच भावे वर्तावया ॥१॥
झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग ।
उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृ॥
 
अर्थे लोपली पुराणे । नाश केला शब्दज्ञाने ।
 विषयलोभी मन । साधने बुडविली ॥२॥
झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग ।
उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृ॥
 
पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा ।
 तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे ॥३॥
झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग ।
उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृ॥
 
१००९ पृष्ठ २२९(देहूकर सांप्रदायिक), ५२० पृष्ठ ९७(शासकीय)

 
 

 

     

पुढील अभंग