Font Problem

       
 
 
 

तुकाराम - सत्यजीत रे

 
 
    भारत रत्‍न सत्यजीत रे (०२-०५-१९२१ - २३-०४-१९९२) यांनी इंदुनाथ
चौधरी यांच्या विनंतीनुसार ‘तुकाराम’ पुस्तकाचे मुखपृष्ठ केले. साहित्य अकादमी यांच्या भारतीय साहित्याचे निर्माते या मालिकेतील १९७५ साली ‘तुकाराम’ हे पुस्तक भालचंद्र नेमाडे (२७-०५-१९३८-) यांनी लिहिले. रे ब्रह्मो समाजाचे सभासद  
होते. ब्रह्मो समाजाच्या सभासदांना  

तुकारामांची ओळख मुख्यत्वे भारतीय

 

 प्रशासकीय सेवेचे पहिले अधिकारी सत्येन्द्रनाथ ठाकुर (टॅगोर) (१८४२-१९२३) यांच्या ‘नव-रत्नमाला वा शास्त्रीय प्रवचन, काव्य ओ विविध कविता, एवं महाराष्ट्रीय भक्त कवि तुकारामेर जीवनी ओ अभंग संग्रह’ यांच्या पुस्तकामुळे झाली. त्यांचा नोकरीचा बराचसा काळ अहमदाबाद, मुंबई, पुणे, कारवार या 

भागात गेला. या काळातील वास्तव्यात प्रार्थनसमाजियांशी आलेल्या संबंधामुळे त्यांचे लक्ष तुकोबांकडे वळले. १८७१ साली पुणे येथे न्यायाधीश असतांना ते तेथील प्रार्थनासमाजात मराठीत प्रवचन देत असत. नंतरच्या काळात त्यांचे धाकटे बंधू कविवर्य रवीन्द्रनाथ ठाकुर (१८६१-१९४१) यांनी तुकोबांचे निवडक अभंग बंगालीत भाषान्तर केले. रविन्द्रनाथांनी त्यांच्या अनुवादाने तुकारामांचे संक्षिप्‍त चरित्र वाचकांसमोर ठेवले. रे शांति निकेतन मध्ये नन्दलाल बोस (१८८३-१९६६) यांचे विद्यार्थी होते. १९४५ साली नन्दलाल बोस यांनी महात्मा गांधी यांच्या विनंतीनुसार तुकोबांचे रेखाचित्र काढले होते. रे यांनी प्रसन्न मुद्रेचे तुकाराम साकारले आहेत.

*****

 वैश्विक " ज्ञानदेव-तुकाराम" कलादालन