भेटीलागी जीवा लागलीसे आस । पाहे रात्री दिवस वाट तुझी
॥१॥
पूर्णिमेचा चंद्र चकोराचे जीवन । तैसे माझे मन वाट पाहे
॥धृ॥
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥२॥
पूर्णिमेचा चंद्र चकोराचे जीवन । तैसे माझे मन वाट पाहे
॥धृ॥
भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥३॥
पूर्णिमेचा चंद्र चकोराचे जीवन । तैसे माझे मन वाट पाहे
॥धृ॥
तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावी देवा ॥४॥

॥धृ॥ |