Font Problem

       
 
 
 

महाभारत

 
 

काय तुझी थोरी वर्णू मी पामर । होसी दयाकर कृपासिंधु ॥१॥
तुज ऐसी दया नाही आणिकांसी । ऐसे हृषीकेशी नवल एक ॥२॥
कुरुक्षेत्रभूमीवरी पक्षी व्याले । तृणामाजी केले कोठे त्यांनी ॥३॥
अकस्मात तेथे रणखांब रोविला । युध्दाचा नेमिला ठाव तेथे ॥४॥
कौरव पांडव दळभार दोन्ही । झुंजावया रणी आले तेथे ॥५॥
तये काळी तुज पक्षी आठविती । पाव बा श्रीपती म्हणोनिया ॥६॥
हस्ती घोडे रथ येथें धांवतील । पाषाण होतील शतचूर्ण ॥७॥
ऐसिये आकांती वाचो कैसे परी । धाव बा श्रीहरी लवलाहे ॥८॥
टाकोनिया पिली कैसे जावे आता । पावे जगन्नाथा लवलाही ॥९॥
आली तिये काळीं कृपा तुझ्या चित्ता । अनाथांच्या नाथा नारायणा ॥१०॥
एका गजाचिया कंठी घंटा होती। पाडिली अवचिती तयांवरी ॥११॥
अठरा दिवस तेथे द्वंदजुंज जाले । वारा ऊन लागले नाही तया ॥११॥
जुंज जाल्यावरी दाविले अर्जुना । तुम्ही नारायणा पक्षियांसी ॥१२॥
पाहे आपुलिया दासा म्या रक्षिले । रणी वाचविले कैशा परी ॥१३॥
ऐसी तुज माया आपुल्या भक्तांची । माउली आमुची तुका म्हणे ॥१४॥
२५५० पृ ४३२ ( शासकीय )

 
 

मागील अभंग

         
 
   

सूची