|
|
चित्र : क्षितीज थिगळे |
२. |
|
एक प्रेमगुज ऐके जगजेठी । आठवली गोष्टी सांगतसे ॥१॥
एक मृग दोन्ही पाडसांसहित । आनंदे चरत होती वनी ॥२॥ |
|
अवचिता तेथे पारधी पावला । घेऊनिया आला श्वाने दोन्ही ॥३॥ |
|
एकीकडे त्याणे चिरिल्या वाघुरा । ठेविले श्वानपुत्रा एकीकडे ॥४॥ |
|
एकीकडे तेणे वोणवा लाविला । आपण राहिला एकीकडे ॥५॥ |
|
चहूंकडोनिया मृगे वेढियेली । स्मरो ते लागली नाम तुझे ॥६॥
रामा कृष्णा हरी गोविंदा केशवा । देवाचिया देवा पावे आता ॥७॥
कोण रक्षी आता ऐसिये संकटी । बापा जगजेठी तुजविण ॥८॥ |
|
आइकोनि तुम्ही तयांची वचने । कृपा अंतःकरणे कळवळिला ॥९॥
आज्ञा तये काळी केली पर्जन्यासी । वेगी पावकासी विझवावे ॥१०॥ |
|
ससे एक तेथे उठवुनी पळविले । तया पाठी गेली श्वाने दोन्ही ॥११॥ |
|
मृगे चमकोनी सत्वर चालली । गोविंदे रक्षिली म्हणोनिया ॥१२॥
ऐसा तू कृपाळु दयाळु आहेसी । आपुल्या भक्तांसी जीवलग ॥१३॥
ऐसी तुझी कीर्ती जीवी आवडती । रखुमाईच्या पती तुका म्हणे ॥१४॥
६७८ पृ १३१ ( शासकीय ) |
|
|
|
|