Font Problem

       
 
 
 

बाळक्रीडा अभंग

 
 

१०१
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । प्रत्यक्ष ये मूर्ति विठोबाची ॥१॥
चहु युगांचे हे साधन साधिले । अनुभवा आले आपुलिया ॥२॥
एवढे करूनि आपण निराळा । प्रत्यक्ष डोळा दाखविले ॥३॥
दावुनि सकळ प्रमाणाच्या युक्‍ति । जयजयकार करिती अवघे भक्‍त ॥४॥
भक्‍ति नवविधा पावली मुळची । जनार्दननामाची संख्या जाली ॥५॥
नवसे ओव्या आदरे वाचिता । त्याच्या मनोरथा कार्यसिध्दि ॥६॥
सीमा न करवे आणीक ही सुखा । तुका म्हणे देखा पांडुरंगा ॥७॥
४६०७ पृ ७७५ (शासकीय)

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग