५३
भारवाही नोळखती या अनंता । जवळी असता अंगसंगे ॥१॥
अंगसंगे तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥२॥
मागुती पडती चिंतेचिये डोही । जयाची हे नाही बुध्दि स्थिर ॥३॥
बुध्दि स्थिर होउ नेदी नारायण । आशबध्द जन लोभिकांची ॥४॥
लोभिका न साहे देवाचे करणे । तुका म्हणे तेणे दुःखी होती ॥५॥
४५६० पृ ७६४ (शासकीय), ३८६१ पृ ६८० (शिरवळकर) |