५२
खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव म्हणे तया भेऊ नका ॥१॥
नका धरू भय धाक काही मनी । बोले चक्रपाणि गौळियांसी ॥२॥
गौळियांसी धीर नाही या वचने । आशंकितमने वेडावली ॥३॥
वेडावली त्यांसी न कळता भाव । देवआदिदेव नोळखता ॥४॥
नोळखता दुःखे वाहाती शरीरी । तुका म्हणे वरी भारवाही ॥५॥
४५५९ पृ ७६४ (शासकीय), ३८६० पृ ६७९ (शिरवळकर) |