५१
जाला कवतुक करिता रोकडे । आणीक ही पुढे नारायण ॥१॥
येउनिया पुढे धरिला मारग । हरावया भाग इंद्रयाजी ॥२॥
इंद्रा दही दूध तूप नेता लोणी । घेतले हिरोनि वाटे त्याचे ॥३॥
हिरोनि घेतल्या कावडी सकळा । म्हणती गोपाळा बरे नव्हे ॥४॥
नव्हे तेचि करी न भे कळिकाळा । तुका म्हणे लीळा खेळे देव ॥५॥
४५५८ पृ ७६४ (शासकीय), ३८५९ पृ ६७९ (शिरवळकर) |