५५
भाग त्या सुखाचे वाकड्या बोबड्या । आपलिया गड्या भाविकांसी ॥१॥
भारवाही गेले टाकुनि कावडी । नवनीतगोडी भाविकांसी ॥२॥
काला करूनिया वाटिला सकळा । आनंदे गोपाळांमाजी खेळे ॥३॥
खेळे मेळे दही दूध तूप खाती । भय नाही चित्ती कवणाचे ॥४॥
कवणाचे चाले तुका म्हणे बळ । जयासी गोपाळ साह्य जाला ॥५॥
४५६२ पृ ७६४ (शासकीय), ३८६३ पृ ६८० (शिरवळकर) |