६५
लोका कळो आला देव आम्हा मधी । टाकिली उपाधि तिही शंका ॥१॥
शंका नाही थोरा लाहाना जीवासी । कळला हा हृषीकेशी मग ॥२॥
मग मनी जाले निर्भर सकळ । संगे लोकपाळ कृष्णाचिया ॥३॥
कृष्णाचिया ओव्या गाणे गाती गीत । कृष्णमय चित्त जाले त्यांचे
॥४॥
त्यांसी ठावा नाही बाहेतील भाव । अंतरीच वाव सुख जाले ॥५॥
सुखे तया दिस न कळे हे राती । अखंड या ज्योती गोविंदाची ॥६॥
चिंतनेचि धाली न लगे अन्नपाणी । तुका म्हणे मनी समाधान ॥७॥
४५७२ पृ ७६७ (शासकीय), ३८७३ पृ ६८३ (शिरवळकर) |