Font Problem

       
 
 
 

बाळक्रीडा अभंग

 
 

६८
जावे बाहेरी हा नाठवे विचार । नाही समाचार ठावा काही ॥१॥
काही न कळे ते कळो आले देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥
कवतुकासाठी भक्‍त देहावरी । आणिताहे हरि बोलावया॥३॥
यांसी नाव रूप नाही हा आकार । कळला साचार भक्‍तां मुखे ॥४॥
मुखे भक्‍तांचिया बोलतो आपण । अंगसंगे भिन्न नाही दोघा ॥५॥
दोघे वेगळाले लेखिल जो कोणी । तयाचा मेदिनी बहु भार ॥६॥
तयासी घडली सकळ ही पापे । भक्‍तांचिया कोपे निंदा द्वेषे ॥७॥
द्वेषियाचा संग न घडावा कोणा । विष जेवी प्राणा नाश करी ॥८॥
करिता आइके निंदा या संतांची । तया होती तेचि अधःपात ॥९॥
पतन उध्दार संगाचा महिमा । त्यजावे अधमा संत सेवी ॥१०॥
संतसेवी जोडे महालाभरासी । तुका म्हणे यासी नाश नाही ॥११॥
४५७५ पृ ७६७ (शासकीय), ३८७६ पृ ६८४ (शिरवळकर)

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग