७५
समागमे असे हरि नेणतिया । नेदी जाऊ वाया अंकितांसि ॥१॥
अंकिता सावध केले नारायणे । गोपाळ गोधने सकळीका ॥२॥
सकळही जन आले गोकुळासी । आनंद मानसी सकळांच्या ॥३॥
सकळांचा केला अंगीकार देवे । न कळता भावे वाचवी त्या ॥४॥
त्यां जाला निर्धार हरि आम्हांपासी । निवांत मानसी निर्भर ती
॥५॥
निर्भर हे जन गोकुळीचे लोक । केले सकळीक नारायणे ॥६॥
नारायण भय येऊ नेदी गांवा । तुका म्हणे नांवा अनुसरे त्या ॥७॥
४५८१ पृ ७७० (शासकीय), ३८८३ पृ ६८६ (शिरवळकर) |