८३
वाया तैसे बोल हरिशी अंतर । केले होती चार भयभेदे ॥१॥
भेदभय गेले नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा जाली ॥२॥
जाली भेटी कंसा हरीशी निकट । सन्मुखचि नीट येरयेरा ॥३॥
येरयेरा भेटी युध्दाच्या प्रसंगी । त्याचे शस्त्र अंगी हाणितले
॥४॥
त्याचे वर्म होते ठावे या अनंता । तुका म्हणे सत्तानायक हा ॥५॥
४५८९ पृ ७७१ (शासकीय), ३८९१ पृ ६८८ (शिरवळकर) |