८४
नारायणे कंस चाणूर मर्दिला । राज्यी बैसविला उग्रसेन ॥१॥
उग्रसेन स्थापियेला शरणागत । पुरविला अंत अभक्ताचा ॥२॥
अवघेचि केले कारण अनंते । आपुलिया हाते सकळ ही ॥३॥
सकळ ही केली आपुली अंकित । राहे गोपीनाथ मथुरेसी ॥४॥
मथुरेसी आला वैकुंठनायक । जाले सकळीक एक राज्य ॥५॥
राज्य दिले उग्रसेना शरणागता । सोडविली माता पिता दोन्ही ॥६॥
सोडवणे धावे भक्ताच्या कैवारे । तुका म्हणे करे शस्त्र धरी
॥७॥
४५९० पृ ७७१ (शासकीय), ३८९२ पृ ६८८ (शिरवळकर) |