Font Problem

       
 
 
 

बाळक्रीडा अभंग

 
 

८५
धरी दोही ठायी सारखाचि भाव । देवकी वसुदेव नंद दोघे ॥१॥
दोन्ही एके ठायी केल्या नारायणे । वाढविला तिणे आणि व्याली ॥२॥
व्याला वाढला हा आपल्या आपण । निमित्या कारणे मायबापा ॥३॥
माय हा जगाची बाप नारायणा । दुजा करी कोण यत्‍न यासी ॥४॥
कोण जाणे याचे अंतरीचा भाव । कळो नेदी माव तुका म्हणे ॥५॥
४५९१ पृ ७७१ (शासकीय), ३८९३ पृ ६८८ (शिरवळकर)

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग