Font Problem

       
 
 
 

बाळक्रीडा अभंग

 
 

८६
दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥१॥
हासे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये पराकृत म्हणो यासी ॥२॥
यासी कळावया एक भक्‍तिभाव । दुजा नाही ठाव धांडोळिता ॥३॥
धांडोळिता श्रुति राहिल्या निश्चित । तो करी संकेत गोपीसवे ॥४॥
गोपिकाची वाट पाहे द्रुमातळी । मागुता न्याहाळी न देखता ॥५॥
न देखता त्यासी उठे बैसे पाहे । वेडावला राहे वेळोवेळा ॥६॥
वेळोवेळा पंथ पाहे गोपिकाचा । तुका म्हणे वाचा नातुडे तो ॥७॥
४५९२ पृ ७७२ (शासकीय), ३८९४ पृ ६८८ (शिरवळकर)

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग