९१
भजल्या गोपिका सर्व भावे देवा । नाही चित्ती हेवा दुजा काही
॥१॥
दुजा छंदु नाही तयांचिये मनी । जागृति स्व्प्नी कृष्णध्यान ॥२॥
ध्यान ज्या हरीचे हरीसी तयांचे । चित्त ग्वाही ज्यांचे तैशा
भावे ॥३॥
भाग्ये पूर्वपुण्ये आठविती लोक । अवघे सकळीक मथुरेचे ॥४॥
मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथे नारायण राज्य करी ॥५॥
राज्य करी गोपीयादवांसहित । कर्मिले बहुतकाळ तेथे ॥६॥
तेथे दैत्यी उपसर्ग केला लोका । रचिली द्वारका तुका म्हणे ॥७॥
४५९७ पृ ७७३ (शासकीय), ३८९९ पृ ६९० (शिरवळकर) |