Font Problem

       
 
 
 

बाळक्रीडा अभंग

 
 

९७
ब्रिदावळी ज्याचे रुळते चरणी । पाउले मेदिनी सुखावे त्या ॥१॥
सुखावे मेदिनी कृष्णाचिये चाली । कुंकुमे शोभली होय रेखा ॥२॥
होउनि भ्रमर पाउलांचे सुख । घेती भक्‍त मुख लावूनिया ॥३॥
याचसाटी धरियेला अवतार । सुख दिले फार निजदासा ॥४॥
निज सुख तुका म्हणे भक्‍ता ठावे । तींही च जाणावे भोगू त्यासी ॥५॥
४६०३ पृ ७७४ (शासकीय), ३९०५ पृ ६९१ (शिरवळकर)

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग