Font Problem

       
 
 
 

बाळक्रीडा अभंग

 
 

९८
भोगिला गोपिका यादवा सकळा । गौळणीगोपाळा गाईवत्सा ॥१॥
गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरी ॥२॥
भक्‍ति नवविधा तयांसी घडली । अवघीच केली कृष्णरूप ॥३॥
रूप दाखविले होता भिन्न भाव । भक्‍त आणि देव भिन्न नाही ॥४॥
नाही राहो दिले जाता निजधामा । तुका म्हणे आम्हांसहित गेला ॥५॥
४६०४ पृ ७७४ (शासकीय), ३९०६ पृ ६९१ (शिरवळकर)

 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग