३.
सोडियेल्या गांठी । दरुषणे कृष्णभेटी ॥१॥
करिती नारी अक्षवाणे । जीवभाव देती दाने ॥धृ॥
उपजल्या काळे । रूपे मोहीली सकळे ॥२॥
करिती नारी अक्षवाणे । जीवभाव देती दाने ॥धृ॥
तुका तेथे वारी । एकी आडोनि दुसरी ॥३॥
करिती नारी अक्षवाणे । जीवभाव देती दाने ॥धृ॥
३१२ पृ ५८ (संताजी), ११५२ पृ १९५ (शिरवळकर), २८३७ पृ ४७६(शासकीय) |