४.
मुख डोळा पाहे । तैशीच ते उभी राहे ॥१॥
केल्याविण नव्हे हाती। धरोनि आरती परती ॥धृ॥
न धरिती मनी। काही संकोच दाटणी ॥२॥
केल्याविण नव्हे हाती। धरोनि आरती परती ॥धृ॥
तुका म्हणे देवे । ओस केल्या देहभावे ॥३॥
केल्याविण नव्हे हाती। धरोनि आरती परती ॥धृ॥
३१३ पृ ५८ (संताजी), ११५३ पृ १९५ (शिरवळकर), २८३८ पृ ४७६(शासकीय) |