१
काय धर्म नीत । तुम्हा शिकवावे हित ॥१॥
अवघे रचियेले हेळा । लीळा ब्रम्हांड सकळा ॥ध्रु॥
नाम महादेव । येथे निवडला भाव ॥२॥
अवघे रचियेले हेळा । लीळा ब्रम्हांड सकळा ॥ध्रु॥
तुका म्हणे वेळे । माझे तुम्हा का न कळे ॥३॥
अवघे रचियेले हेळा । लीळा ब्रम्हांड सकळा ॥ध्रु॥
३३४७ पृष्ठ ६१६ (देहूकर सांप्रदायिक),१५०३ पृष्ठ २६० (शासकीय)
२
भांडावे ते गोड । पुरे सकळ ही कोड ॥१॥
ऐसा घरीचा या मोळा । ठावा निकटा जवळा ॥ध्रु॥
हाक देता दारी । येती जवळी सामोरी ॥२॥
ऐसा घरीचा या मोळा । ठावा निकटा जवळा ॥ध्रु॥
तुका म्हणे शिवे । मागितले हाती द्यावे ॥३॥
ऐसा घरीचा या मोळा । ठावा निकटा जवळा ॥ध्रु॥
३३४८ पृष्ठ ६३१ (देहूकर सांप्रदायिक),१५०३ पृष्ठ २६० ( शासकीय)
|