४.
मागे बहुता जन्मी । हे चि करित आलो आम्ही ।
भवतापश्रमी । दुःखे पीडिली निववू त्या ॥१॥
गर्जो हरिचे पवाडे । मिळो वैष्णव बागडे ।
पाझर रोकडे । काढू पाषाणामध्ये ॥धृ॥
भाव शुध्द नामावळी । हर्षे नाचो पिटू टाळी ।
घालू पाया तळी । कळिकाळ त्याबळे ॥२॥
गर्जो हरिचे पवाडे । मिळो वैष्णव बागडे ।
पाझर रोकडे । काढू पाषाणामध्ये ॥धृ॥
कामक्रोध बंदखाणी ।तुका म्हणे दिले दोन्ही ।
इंद्रियांचे धनी । आम्ही जालो गोसावी ॥३॥
गर्जो हरिचे पवाडे । मिळो वैष्णव बागडे ।
पाझर रोकडे । काढू पाषाणामध्ये ॥धृ॥
३१७८ पृष्ठ ५८८(देहूकर सांप्रदायिक),२३०२ पृष्ठ ३९३(शासकीय) |