५.
ब्रम्हज्ञान जरी एके दिवसी कळे । तात्काळ हा गळे अभिमान ॥१॥
अभिमान लागे शुकाचिये पाठी । व्यासे उपराटी दृष्टी केली ॥२॥
जनक भेटीसी पाठविला तेणे । अभिमान नाणे खोटे केले ॥३॥
खोटे करूनिया लाविला अभ्यासी । मेरु शिखरासी शुक गेला ॥४॥
जाऊनिया तेणे साधिली समाधी । तुका म्हणे तधी होतो आम्ही ॥५॥
३३३३ पृष्ठ ६१४ (देहूकर सांप्रदायिक), २४७८ पृष्ठ ४२१(शासकीय) |