Font Problem

     
 

 

तुकाराम बोल्होबा आंबिले

 
 

इंद्रायणीचा डोह

 
 

 

फुटून याव्यांत रक्‍तात, लालजर्द सांयकाळी ।
तुझ्या अभंग ओळी ॥

गाभुळल्या दुखण्याची गच्च काळोखी दुपार।
तुझा बुडाला व्यापार ॥

पांगुळल्या देहभोगी तुझ्या हाती माझे बोट।
दिसे प्रकाशाचे बेट ॥

हज्जारदा त्यांनी तुला मनसोक्‍त बुडवावं ।
दरवेळी मात्र मीही इंद्रायणीचा डोह व्हावं ॥

अमोल बागूल

 
 

अनुक्रमणिका