Font Problem

     
 
     
 

चकोर

 
 

माझी तहान सरेना
गेली कोठे चंद्रकोर
एका अक्षराच्यासाठी
माझी कविता चकोर

तुकयाच्या पुढे माझे
थिटे युध्दाचे प्रसंग
इंद्रायणीच्या गाळात
माझे रुतले अभंग

दुरावली मायबोली
जीव कासावीस झाला
अमृताशी पैजा घेत
माझा व्यापार बुडाला


************

डॉ. राजा दीक्षित,
२, भालचंद्र हाइट्स,
८४७ सदाशिव पेठ,
पुणे ४११०३०
दूरध्वनी : २४४७७८३७

 
 

अनुक्रमणिका

 
 

सौजन्य : 'कविताश्री' - दिवाळी अंक , १९९१.