|
|
|
बक |
|
|
कावळयाच्या गळा मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥१॥
गजालागी केला कस्तुरीचा लेप । तिचे तो स्वरूप काय जाणे ॥२॥
बकापुढे सांगे भावार्थे वचन । वाउगाचि सीण होय त्यासी ॥३॥
तुका म्हणे तैसे अभाविक जन । त्यांसी वाया सीण करू नये ॥४॥ |
छायाचित्र - प्रदीप हिरुरकर
|
|
*** |
जळो प्रेमा तैसा रंग । जाय भुलोनि पतंग ॥१॥
सासूसाठी रडे सून । भाव अंतरीचा भिन्न ॥धृ॥
मैंद मुखीचा कोंवळा। भाव अंतरी निराळा ॥२॥
सासूसाठी रडे सून । भाव अंतरीचा भिन्न ॥धृ॥
जैसी वृंदावनकाती । उत्तम धरू नये हाती॥३॥
सासूसाठी रडे सून । भाव अंतरीचा भिन्न ॥धृ॥
बक ध्यान धरी । सोंग करूनि मासे मारी ॥४॥
सासूसाठी रडे सून । भाव अंतरीचा भिन्न ॥धृ॥ |
|
छायाचित्र :
©
विलियम व्हॅन |
तुका म्हणे सर्प डोले । तैसा कथेमाजी खुले ॥५॥
सासूसाठी रडे सून । भाव अंतरीचा भिन्न ॥धृ॥
*** |
|
|
देवाचे भजन का रे न करीसी । अखंड हव्यासी पीडतोसी ॥१॥
देवासी शरण का रे न वजवे तैसा । बक मीना जैसा मनुष्यालागी ॥२॥
देवाचा विश्वास का रे नाही तैसा । पुत्रस्नेहे जैसा गुंतलासी
॥३॥
का रे नाही तैसी देवाची हे गोडी । नागवूनी सोडी पत्नी तैसी ॥४॥
का रे नाही तैसे देवाचे उपकार । माया मिथ्या भार पितृपूजना ॥५॥
का रे भय वाहासी लोकाचा धाक । विसरोनि एक नारायण ॥६॥
तुका म्हणे का रे घातले वाया । अवघे आयुष्य जाया भक्तिविण ॥७॥
|
|
छायाचित्र :
© विलियम व्हॅन |
|
*** |
|
भाव नाही काय मुद्रा वाणी । बैसे बगळा निश्चळ ध्यानी ॥१॥
न मनी नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥धृ॥
नाही चाड देवाची काही । छळणे टोंके तस्करघाई ॥२॥
न मनी नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥धृ॥
तुका म्हणे त्याचा संग । नको शब्द स्पर्शअंग ॥३॥
न मनी नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥धृ॥
छायाचित्र :
©
विलियम व्हॅन |
|
|
*** |
करिता वेरझारा । उभा न राहासी वेव्हारा ॥१॥
हे तो झोंडाईचे चाळे । काय पोटी ते न कळे ॥धृ॥
आरगुणी मुग । बैसलासी जैसा बग ॥२॥
हे तो झोंडाईचे चाळे । काय पोटी ते न कळे ॥धृ॥
तुका म्हणे किती । बुडविली आळविती ॥३॥
हे तो झोंडाईचे चाळे । काय पोटी ते न कळे ॥धृ॥
***
काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचे ॥१॥
अंतरीची बुध्दि खोटी । भरले पोटी वाईट ॥धृ॥
काय उंदीर नाही धांवी । राख लावी गाढव ॥२॥
अंतरीची बुध्दि खोटी । भरले पोटी वाईट ॥धृ॥
तुका म्हणे सुसर जळी । काउळी का न न्हाती ॥३॥
अंतरीची बुध्दि खोटी । भरले पोटी वाईट ॥धृ॥
*** |
|
|
|
|
|
सूची
|
|
|