Font Problem

       
 
 
 

पक्षी

 
     
 

घुबड
ऐसे पुढती मिळता आता ।
नाही सत्ता स्वतंत्र ॥१॥
म्हणउनि फावले ते घ्यावे ।
नाम गावे आवडी ॥धृ॥

संचित प्रारब्ध गाढे ।
धांवे पुढे क्रियमाण ॥२॥
म्हणउनि फावले ते घ्यावे ।
नाम गावे आवडी ॥धृ॥

तुका म्हणे घुबडा ऐसे ।
जन्म सरिसे शुकराचे ॥३॥
म्हणउनि फावले ते घ्यावे ।
नाम गावे आवडी ॥धृ॥

छायाचित्र - प्रदीप हिरुरकर
 
 

मागील अभंग

     

पुढील अभंग

 
 
 

सूची