Font Problem
पक्षी
घार पाहा कैसे कैसे । देवे उध्दरिले अनायासे ॥१॥ ऐका नवल्याची ठेव । नेणता भक्तिभाव ॥धृ॥ कैलासासी नेला । भिल्ल पानेडी बैसला ॥२॥ ऐका नवल्याची ठेव । नेणता भक्तिभाव ॥धृ॥ पांखांच्या फडत्कारी । उध्दरुनी नेली घारी ॥३॥ ऐका नवल्याची ठेव । नेणता भक्तिभाव ॥धृ॥
छायाचित्र : विलास आंब्रे
खेचरे पिंडी दिला पाव । त्या पूजने धाये देव ॥४॥ ऐका नवल्याची ठेव । नेणता भक्तिभाव ॥धृ॥ तुका म्हणे भोळा । स्वामी माझा हो कोंवळा ॥५॥ ऐका नवल्याची ठेव । नेणता भक्तिभाव ॥धृ॥
मागील अभंग
पुढील अभंग
सूची