|
|
राजहंस |
वसने थिल्लरी । बेडुक सागरा धिक्कारी ॥१॥
नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हावा ॥धृ॥
फुगाते काउळे । म्हणे मी राजहंसा आगळे ॥२॥
नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हावा ॥धृ॥ |
|
गजाहूनि खर । म्हणे चांगला मी फार ॥३॥
नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हावा ॥धृ॥
मुलाम्याचे नाणे । तुका म्हणे नव्हे सोने ॥४॥
नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हावा ॥धृ॥
*** |
परजन्ये पडावे आपुल्या स्वभावे । आपुलाल्या दैवे पिके भूमि ॥१॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥
दीपाचिये अंगी नाही दुजाभाव । धणी चोर साव सारिखे चि ॥२॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥
|
|
काउळे ढोपरा ककर तितिरा । राजहंसा चारा मुक्ताफळे ॥३॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥
तुका म्हणे येथे आवडी कारण । पिकला नारायण जया तैसा ॥४॥
बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥ |
*** |
मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची॥१॥
एकाचिये अंगी दुजियाचा वास । आशा पुढे नाश सिध्द करी ॥धृ॥
आधी फळासी कोठे पावो शके । वासनेची भिकेवरी चाली ॥२॥
एकाचिये अंगी दुजियाचा वास । आशा पुढे नाश सिध्द करी ॥धृ॥ |
|
|
तुका म्हणे राजहंस ढोरा नाव । काय तया घ्यावे अळंकाराचे ॥३॥
एकाचिये अंगी दुजियाचा वास । आशा पुढे नाश सिध्द करी ॥धृ॥ |
*** |
वांजा गाई दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति ॥१॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृ॥
चातक पाखरू । त्यासी वर्षे मेघधारु ॥२॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृ॥
|
|
पक्षी राजहंस । अमोलिक मोती त्यास॥३॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृ॥
तुका म्हणे देवा । का गा खोचलासी जीवा ॥४॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृ॥
***
नका दंतकथा येथे सांगो कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ॥१॥
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हा पुढे ॥धृ॥
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळाली ॥२॥
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हा पुढे ॥धृ॥ |
|
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे । येरा गाबाळाचे काय काम ॥३॥
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हा पुढे ॥धृ॥
***
अगा ये मधुसूदना माधवा । अगा ये कमळापती यादवा ।
अगा श्रीधरा केशवा । अगा बांधवा द्रौपदीच्या ॥१॥
अगा विश्वव्यापका जनार्दना । गोकुळवासी गोपिकारमणा ।
अगा गुणनिधि गुणनिधाना । अगा मर्दना कंसाचिया ॥धृ॥
अगा सर्वोत्तमा सर्वेश्वरा । गुणातीता विश्वंभरा ।
अगा निर्गुणा निराकारा । अगा आधारा दीनाचिया ॥२॥
अगा उपमन्यसहाकारा । अगा शयना फणिवरा ।
अगा काळकृतांत असुरा । अगा अपारा अलक्षा ॥३॥
अगा वैकुंठनिवासा । अगा अयोध्यापति राजहंसा ।
अगा ये पंढरिनिवासा। अगा सर्वेशा सहजरूपा ॥४॥ |
|
अगा परमात्मा परमपुरुषा। अगा अव्यया जगदीशा ।
अगा कृपाळुवा आपुल्या दासा । तोडी भवपाशा तुका म्हणे ॥५॥ |
|
|
|
|
|
सूची
|
|
|