Font Problem
पक्षी
तित्तीर परजन्ये पडावे आपुल्या स्वभावे । आपुलाल्या दैवे पिके भूमि ॥१॥ बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥
दीपाचिये अंगी नाही दुजाभाव । धणी चोर साव सारिखे चि ॥२॥ बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥ काउळे ढोपरा ककर तित्तीर । राजहंसा चारा मुक्ताफळे ॥३॥ बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥
चित्र : पर्यावरण शिक्षण केंद्र
तुका म्हणे येथे आवडी कारण । पिकला नारायण जया तैसा ॥४॥ बीज ते चि फळ येईल शेवटी । लाभ हानि तुटी ज्याची तया ॥धृ॥ ***
मागील अभंग
पुढील अभंग
सूची