५९
वेडावली काय करावे या काळी । म्हणे वनमाळी गोपाळांसी ॥१॥
शिरी धरू गोवर्धन उचलूनि । म्हणे तुम्ही कोणी भिऊ नका ॥२॥
नका सांडू कोणी आपला आवांका । मारिता या हाका आरोळिया ॥३॥
अशंकित चित्ते न वटे त्या खरे । धाकेच ते बरे म्हणती चला ॥४॥
चित्ती धाक परि जवळी अनंत । तुका म्हणे घात होऊ नेदी ॥५॥
४५६६ पृ ७६५ (शासकीय), ३८६७ पृ ६८१ (शिरवळकर) |