६३
वाचाळ लटिके अभक्त जे खळ । आपुले ते बळ वाखाणीती ॥१॥
बळे हुंबरती सत्य त्या न कळे । नुघडती डोळे अंधळ्यांचे ॥२॥
आसुडिल्या माना हात पाय नेटे । तव भार बोटे उचलिला ॥३॥
लटिकाचि आम्ही सीण केला देवा । कळो आले तेव्हा सकळांसी ॥४॥
आले कळो तुका म्हणे अनुभवे । मग अहंभावे सांडवले ॥५॥
४५७० पृ ७६६ (शासकीय), ३८७१ पृ ६८२ (शिरवळकर) |