७९
सैन्य जन हासे राया जाले काई । वासपे तो ठायी आपणासी ॥१॥
आपणा आपण जयास ती तैसी । वैरभाव ज्यांसी भक्ति नाही ॥२॥
नाही याचा त्याचा भाव एकविध । म्हणऊनि छंद वेगळाले ॥३॥
वेगळाल्या भावे ती तया हासती । तयास दिसती अवघी हरि ॥४॥
हरिला कंसाचा जीव भाव देवे । द्वेषाचिया भावे तुका म्हणे ॥५॥
४५८५ पृ ७७० (शासकीय), ३८८७ पृ ६८७ (शिरवळकर) |