८८
मारिले असुर दाटले मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते ॥१॥
ते हा नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥२॥
वारिले ते दूतीयमाचिया दंडी । नुच्चरिता तोंडी नारायण ॥३॥
नारायण नाम नावडे जयासी । ते जाले मिरासी कुंभपाकी ॥४॥
कुंभपाकी सेल मान तो तयांचा । तुका म्हणे वाचा संतनिंदा ॥५॥
४५९४ पृ ७७२ (शासकीय), ३८९६ पृ ६८९ (शिरवळकर) |