केली सीता शुध्दी । मूळ रामायणा आधी ॥१॥
ऐसा प्रतापी गहन । सुरा भक्तांचे भूषण ॥ध्रु॥
जाउनी पाताळा। केली देवीची अवकळा ॥२॥
ऐसा प्रतापी गहन । सुरा भक्तांचे भूषण ॥ध्रु॥
राम लक्षुमण । नेले आणिले चोरून ॥३॥
ऐसा प्रतापी गहन । सुरा भक्तांचे भूषण ॥ध्रु॥
जोडुनिया कर । उभा सन्मुख समोर ॥४॥
ऐसा प्रतापी गहन । सुरा भक्तांचे भूषण ॥ध्रु॥
तुका म्हणे जपे । वायुसुता जाती पापे ॥५॥
ऐसा प्रतापी गहन । सुरा भक्तांचे भूषण ॥ध्रु॥
९१८ पृष्ठ २१३ (देहूकर सांप्रदायिक),२८४ पृष्ठ ४८( शासकीय)
काम घातला बांदोडी । काळ केला देशधडी ॥१॥
तया माझे दंडवत । कपिकुळी हनुमंत ॥ध्रु॥
शरीर वज्रा ऐसे । कवळी ब्रम्हांड जो पुच्छे ॥२॥
तया माझे दंडवत । कपिकुळी हनुमंत ॥ध्रु॥
रामाच्या सेवका । शरण आलो म्हणे तुका ॥३॥
तया माझे दंडवत । कपिकुळी हनुमंत ॥ध्रु॥
९१९ पृष्ठ २१४ (देहूकर सांप्रदायिक),२८५ पृ ४८( शासकीय)
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु॥
करोनी उड्डाण । केले लंकेचे दहन ॥२॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु॥
जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥३॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु॥
पृष्ठ (देहूकर सांप्रदायिक),२८६ पृष्ठ ४८( शासकीय) |