पाहा कैसेकैसे । देवे उद्धरिले अनायासे ॥१॥
ऐका नवलाईची ठेव । नेणता भक्तिभाव ॥ध्रु॥
कैलासासी नेला । भिल्ल पानेडी बैसला ॥२॥
पांखांच्या फडत्कारी । उद्धरुनी नेली घारी ॥३॥
चोरे पिंडी दिला पाव । त्या पूजने धाये देव ॥४॥
तुका म्हणे भोळा । स्वामी माझा हो कोवळा ॥५॥
३७३६ पृ ६१३ ( शासकीय)
|