Font Problem
पक्षी
कोकिळ पतिव्रता नेणे आणिकाची स्तुती । सर्वभावे पति ध्यानी मनी ॥१॥ तैसे माझे मन एकविध जाले । नावडे विठ्ठलेविण दुजे ॥धृ॥ सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळा वसंतेसी ॥२॥ तैसे माझे मन एकविध जाले । नावडे विठ्ठलेविण दुजे ॥धृ॥
छायाचित्र - प्रदीप हिरुरकर
तुका म्हणे बाळ मातेपुढे नाचे । बोल आणिकाचे नावडती ॥३॥ तैसे माझे मन एकविध जाले । नावडे विठ्ठलेविण दुजे ॥धृ॥
मागील अभंग
पुढील अभंग
सूची