|
|
कोंबडा
काय दिनकरा । केला कोंबड्याने खरा ॥१॥
का हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथा देवा ॥धृ॥
आडविले दासी । तरि का मरती उपवासी ॥२॥
का हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथा देवा ॥धृ॥
तुका म्हणे हाती । कळा सकळ अनंती॥३॥
का हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथा देवा ॥धृ॥ |
|
छायाचित्र - प्रदीप हिरुरकर |
|
मागे जैसा होता माझे अंगी भाव । तैसा एक ठाव नाही आता ॥१॥
ऐसे गोही माझे मन मजपाशी । तुटी मुद्दलेसी दिसे पुढे ॥धृ॥
पुढिलांचे मना आणि गुणदोष । पूज्य आपणांस करावया ॥२॥
ऐसे गोही माझे मन मजपाशी । तुटी मुद्दलेसी दिसे पुढे ॥धृ॥
तुका म्हणे जाली कोंबडयाची परी । पुढेची उकरी लाभ नेणे ॥३॥
ऐसे गोही माझे मन मजपाशी । तुटी मुद्दलेसी दिसे पुढे ॥धृ॥
*** |
नारे तरी काय नुजेडे कोंबडे । करूनिया वेडे आघ्रो दावी ॥१॥
आइत्याचे साहे फुकाचा विभाग । विक्षेपाने जग छी थू करी ॥धृ॥
नेमून ठेविला करत्याने काळ । नल्हायेसे बळ करू पुढे॥२॥
आइत्याचे साहे फुकाचा विभाग । विक्षेपाने जग छी थू करी ॥धृ॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहे । घातलिया भये नर्का जाणे
॥३॥
आइत्याचे साहे फुकाचा विभाग । विक्षेपाने जग छी थू करी ॥धृ॥ |
|
|
|
|
|
सूची
|
|
|