Font Problem

       
 
 
 

सूची

 
 
 

 
 

जगाचा हा बाप दाखविले माये । माती खाता जाये मारावया ॥

 

जननी हे म्हणे आहा काय जाले । शरीर रक्षिले काय काजे ॥

 

जयेवेळी चोरूनिया नेली वत्से । तयालागी तैसे होणे लागे ॥

 

जाणवले इंद्रा चरित्र सकळ । वाकुल्या गोपाळ दाविताती ॥१॥

 

जाय फाकोनिया निवडिता गाई । आपलाल्या सोयी घराचिये ॥

जाला कवतुक करिता रोकडे । आणीक ही पुढे नारायण ॥१॥

 

जालो स्वये कृष्ण आठव हा चित्ती । भेद भयवृत्ति उरली आहे ॥

 

जावे बाहेरी हा नाठवे विचार । नाही समाचार ठावा काही ॥

 

जीवभाव त्याचा गेला अभिमान । म्हणऊनि जन हासे कंसा ॥