Font Problem

       
 
 
 

सूची

 
 
 

 
 

नाचता देखिली गाई वत्से जन । विस्मित होऊन इंद्र ठेला ॥

 

नारायण आले निजमंदिरासि । जाले या लोकांसी बहुडविले ॥

 

नारायण भूती न कळे जयांसि । तयां गर्भवासी येणे जाणे ॥

 

नारायणे कंस चाणूर मर्दिला । राज्यी बैसविला उग्रसेन ॥

 

नाही त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥

 

नाही नाश हरि आठविता मुखे । जोडतील सुखे सकळ ही ॥

 

निजदास उभा तात्काळ पायापे । स्वामी देखे सर्पें वेष्टियेला ॥

 

नेणे वर्ण धर्म जी आली सामोरी । अवघीच हरि आळिंगिली ॥

 

नेदी कळो केल्याविण ते कारण । दाखवी आणून अनुभवा ॥

 

नेदी दुःख देखो दासा नारायण । ठेवी निवारून आल्या आधी ॥

 

नेणतिया साटी नेणता लाहान । थिंकोनि भोजन मागे माये ॥