Font Problem

     
 
प्रस्तावना
अभंगगाथा
पक्षी
लघु कथा
अभंगरूपीचित्र
चरित्र
विश्व कोश
पुस्तक
लेख
कविता
भजन श्रवण
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
देहू दर्शन
रंगभूमी
कला दालन
 
पालखी
छत्रपती शिवाजी
 
महात्मा गांधी
 
बाबाजी परांजपे
 
संकेतस्थळाबद्दल
 
मुख्य पान
 
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ

 जगण्यातल्या विविध वाटांचा शोध

- प्रसाद कुवळेकर

तुकारामांनी ज्या जागेवर बसून अभंग रचलेत्या विठ्ठल मंदिरातील ओवरी. दि. बा. मोकाशींची याच नावाची अत्यंत गाजलेली कादंबरी. त्यांच्यावरचं नाटक. रंगावृत्ती दिग्दर्शन-अतुल पेठे आणि कलाकार - किशोर कदम-ही नांव प्रयोगापर्यंत खेचायला पुरेशी होती. प्रयोग पाहिल्यावर मनात अनेक प्रश्न उभे राहिले. त्यासाठी प्रयोगाचे कर्ता-करविते अतुल पेठे यांनाच गाठलं आणि या निर्मितीबद्दलच कुतूहल त्यांच्यापुढे उघड केल.

परंपरेशी असलेल्या नात्याचा धागा तोडताना तो आधी जोडावा लागतो. व्याकरणातले नियम बदलण्यासाठी ते आधी माहीत असावे लागतात. सॉक्रेटिस हा विचारांच्या पातळीवर किती शिल्लक राहतो आणि त्याची नाळ आजच्या युगातल्या प्रश्नांशी कशी जोडता येईलया विचारातून सूर्य पाहिलेला माणूस ची निर्मिती झाली. तसंच आनंदओवरी ही एका अर्थाने तुकारामाचा शोध घेणारी गोष्ट असली तरी कान्होबाच्या आत्मकथनातून ती जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा त्याच्या मुखातून सामान्य माणूसपणाचे प्रश्न निर्माण करून ती मोकळी होते. तुकारामाच्या संत होण्याच्या प्रक्रियेतील वेदना जी त्याच्या कुटुंबियांनी भोगलीती तर तुमच्या - आमच्या घरातीलच ! मग तुकाराम ही ऐतिहासिक व्यक्ती असेना का! त्यातला माणूस एकदा सापडला की काळाची बंधनं आपोआपच गळून पडतातहे जाणवलं. १९८८ साली मी दि. बा. मोकाशीची आनंदओवरी वाचली.

         संतांच्या आयुष्याबद्दल मला पहिल्यापासून विलक्षण आकर्षण आहे. वारकरी संप्रदायातील एकेक संतचरित्र हे अत्यंत क्रांतिकारक आणि तत्कालीन समाजाला न पेलणारं असं आहे. त्या कोणीही बुवाबाजी करणाऱ्या ढोंगी व्यक्ती नव्हत्यातर मानवतावादसहिष्णुता आणि एकात्मतेची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणणाऱ्या सामान्य व्यक्तीच होत्या ! जगण्यातल्या विविध वाटा धुंडाळण्याचा प्रयत्न करत सामान्य माणसाला जगणं शिकवणाऱ्या या व्यक्ती होत्या. भक्तीपरंपरेबरोबरच भाषिक परंपरेचा मोठाच साठा त्यांनी लोकांसमोर उघडा केला. विविध विषयांवरच्याविविध अनुभवांवरच्या ओव्या अभंग आणि त्यातलं विपुल शब्दभांडार ही त्यांची शक्ती होती.

                     किशोर कदम

                         अतुल पेठे

कांदामुळाभाजी अवघी विठाई माझी असं म्हणताना सावतामाळी work is workship हाच मंत्रोच्चार करतो. आपल्या दैनंदिन विश्वातल्या प्रत्येक वस्तूला परमेश्वर मानून त्यातं एक निर्गुण रूप त्यांनी तयार केलं. विठ्ठलाची मूर्ती ही तर माझ्या विशेष आवडीची ! कारण त्याच्या हातात कुठलंही आयुध नाही. हात कमरेवर ठेवून अगदी सामान्य माणसासारखं वाटणारं ते रूप आहे. हे सगळं मनात आधीपासूनच साठलं होतं. आनंओवरी वाचल्याबरोबर तुकाराम हा माझ्या मनातल्या किंवा माझ्यातल्या कलाकाराच्या मनातल्या तुकारामाच्या चौकटीत फिट्ट बसला आणि मग मी पुढच्या प्रवासाचं तिकीट काढलं. नाना पाटेकर डोळयांसमोर ठेवून अतुलने सुरुवातीला रंगावृत्ती तयार केली. पण काही कारणांमुळे ही निर्मिती प्रक्रिया मागे पडली. पाच-सहा वर्षांपूर्वी किशोर कदमच्या वाचनात ती कादंबरी आल्यावर त्याच्यातल्या कलाकाराने अतुलकडे मागणी केली की ही गोष्ट मी एकटा सांगणार ! अतुल पेठेंनी एकवार त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्यातल्या कलाकारावर अविश्वास दाखवत चक्क त्याला नकार दिला. किशोरला स्वस्थ बसवेना. तो पुन्हा त्याच मागणीसहित अतुलकडे आला आणि हट्ट धरून बसला. दीड महिन्यात पंचवीस पानं पाठ करून दाखव. पानं पाठ झाली तर पुढचं पाहूअसं अतुलनं बजावलं. दीड महिन्यानंतर किशोर आला आणि त्यानं पंचवीस पानं धडाधडा बोलून दाखवली.

मग सुरू झाला निर्मितीचा मुख्य प्रवास ! तब्बल सात महिने अविश्रांत मेहनत ! शेवटच्या दीड महिन्यात बाहेरचे प्रयोगशूटिंगकाव्यवाचन.... सगळं बंद. सकाळचा व्यायाम सक्तीचा. कारण अतुलच्या मतेकान्होबा हा काबाडकष्ट करणारा काटक गडी तो पोट वाढलेलासुखवस्तू दिसता कामा नये. शरीरानं कान्होबा तयार होत होता. दरम्यानच्या काळात इंद्रायणीचा काठभंडाऱ्याचा डोंगरदेहू इथली भटकंती ! कारण तुकोबाचं अवघं विश्व त्या निसर्गतत्त्वाशी एकरूप झालेलं ! आणि जोडीला तुकारामांची गाथानेमाडेचित्रेसदानंद मोरे यांनी लिहिलेलं तुकारामावरचं साहित्य होतंच. कारण तोही एक या निर्मिती प्रक्रियेचाच भाग होता.

खरं तर सुरुवातीला गणेश यादवसयाजी शिंदे आणि किशोर अशा तिघांना घेऊन मला हे करायचं होतंअतुल पेठे यांच्यातला दिग्दर्शक सांगत होता - मला हे कान्होबा तिघांतून हवा होता. त्यामुळे तीन वेगवेगळे आवाज मला मिळणार होते. तीन वेगळी परिमाणं मिळणार होती आणि पुन्हा त्या तिघांचा एकसंध कान्होबा हे मला खूप आव्हानात्मक वाटत होतं. मात्र किशोरच्या आत्मविश्वासावर आणि मेहनतीवर मी विश्वास टाकला आणि त्याने तो एकशेएक टक्के सार्थ ठरविला. नेपथ्यातले अंधार-प्रकाशाचे खेळही खूप विचारपूर्वक केले आणि पार्श्वसंगीतासाठी वापरलेली वाद्यं ही त्याच मातीतली होती. यातल्या घंटेचा नाद करण्यासाठी जी घंटा वापल्येय ती खास राजस्थानमधली आहे. उंटांच्या गळयात अशा घंटा बांधतात. ती अहमदाबादच्या एका मैत्रिणीने पाठवली. कारण देवळातल्या घंटेचं नादमाधुर्य मला नको होतं. या घंटेच्या नादात एक गूढता आहे. ती मला हवी होती.

       इतक सगळ झाल्यानंतर अभिजात रंगभूमीपुणे या संस्थेनंविशेषतः प्रसाद वनासरेसारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या रंगकर्माने निर्मितीचा उत्साह दाखवला आणि अतुल पेठेकिशोर कदम आणि इतर तंत्रज्ञ यांच्या मेहनतीला फळ आलं. आनंओवरी चा प्रत्यक्ष रंगमंचीय आविष्कार बरंच काही देऊन जातो. संपूर्ण पार्श्वभूमीवरचा निसर्ग सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र-मध्यरात्र अशा वेगवेगळया प्रहरातील कान्होबाची आणि आजूबाजूच्या निसर्गाच अवस्थापावसाळयात निसर्गाच्या तांडवाबरोबरच बेभान होणारा कान्होबाबैलगाडीची सुसाट सफर....आणि या सगळयाबरोबर किशोर कदम यांचा परकायाप्रवेश यांत प्रेक्षक नकळत गुंतून जातो.

माणसामध्ये उपजत असलेल्या नातेसंबंधांची चर्चा करणारं किंवा नात्याच्या घट्ट विणीच हे नाटक आहे. आजच्या काळातल्या तुकडा-तुकडांत सापडणाऱ्या आयुष्याच्या किंवा जगण्याच्या संकल्पना तपासून पांहणारं हे नाटक आहे. म्हणूनच ते मला करावंस वाटलं. अतुल पेठे बोलत होते- कान्होबाला सापडणारा तुकाराम हा एक परिवर्तनशीलजीवनाच्या अनेक वाटा शोधणारा जगण्यातल्या अनेक रसरशीत अनुभवांचा आस्वाद घेणारा सामान्य माणूस आहे. मात्रया प्रवासात त्याच्या कुटुंबाची होणारी ससेहोलपट आणि कान्होबाला शेवटी गवसलेलं शहाणपण या सगळयाची नाळ ही २१ व्या शतकातल्या सामान्य माणसाच्या प्रश्नांशी जुळणारी आहे.

       कुमार गंधर्वांनी एका अत्यंत खाजगी मैफिलीत केवळ स्वरांच्या साहाय्याने (कुठलाही सूर न वापरता) तुकारामाला शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे केवळ दोनच प्रयोग झाले. पण तो प्रयत्न विलक्षण प्रभाव टाकणारा होता. एका खऱ्या खुऱ्या कलावंताने रसिकाला दिलेली ती भेट होती. चर्चा संपता संपता अतुलने ही आठवण सांगितली. असाच प्रयत्न आनंदओवरी नाटनिर्मितीतून केला गेला आहे आणि एक तरी ओवी त्यांनी अनुभली आहे. आता पाळी रसिक प्रेक्षकांची आहे!

सौजन्य : लोकसत्तामुंबई, डिसेंबर, २००२.