tukaram.com (तुकाराम डॉट कॉम) हे कविश्रेष्ठ तुकाराम यांच्या साहित्याला वाहिलेले
संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर देहू येथील श्री तुकाराम महाराज संस्थानच्या
सौजन्याने तुकाराम गाथेची देहू प्रत डाऊनलोड करिता उपलब्ध करून
देण्यात आली आहे. तुकाराम डॉट कॉम या संकेतस्थळाचे उद्घाटन १७ फेब्रुवारी २००२ रोजी झाले. दिलीप धोंडे हे या संकेतस्थळाचे प्रकल्प समन्वयक असून
डॉ.
सदानंद मोरे, व दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या
मार्गदर्शनाखाली नरेंद्र बर्हाटे, गिरीश गांधी, देवेन राक्षे , सतीश पंडिलवार आणि त्यांच्या
सहकाऱयांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे. दिवंगत बॅरिस्टर
बाबाजी गणेश परांजपे यांना
हे संकेतस्थळ समर्पित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर मराठीत अभंगरूपीचित्र,
चरित्र, लेख, विश्व कोश, पुस्तक, भजन श्रवण, पालखी, बाळगोपाळांसाठी, तुकाराम बीज,
देहू दर्शन, रंगभूमी, कला दालन, छत्रपती शिवाजी, महात्मा गांधी आणि बाबाजी परांजपे
हे सदर आहेत.लेख विभागात राम बापट, सदानंद मोरे, दिलीप धोंडगे व पुरुषोत्तम यशवंत
देशपांडे यांचे लेख आहेत.
राजस्थानी विभागात यांनी डॉ. सत्यनारायण स्वामी यांनी अनुवादीत केलेले चरित्र आहे.
तुकोबांच्या निवडक अभंगांचे निरुपण त्यांनी केलेले आहे. डॉ. सत्यनारायण स्वामी यांनी
या पूर्वी शिवाजी सावंत यांची साहित्यकृती "मृत्युंजय" राजस्थानी मध्ये अनुवादीत
केली आहे.
गुजराती विभागात निळकंठ पंचभाई यांनी तुकोबांचे अनुवादीत केलेले ८०० अभंग
आहेत.केदारनाथ यांनी लिहिलेले संक्षिप्त चरित्र आहे.लहान मुलांकरिता चित्ररुपी अभंग
आहे.कलादालन आहे.
कोंकणी मध्ये पद्मश्री सुरेश आमोणकर यांनी लिहिलेले संक्षिप्त चरित्र आहे.लहान
मुलांकरिता चित्ररुपी अभंग आहे. तुकोबांचे अभंगरुपी लघु कथा आहेत.
सिंधी विभागात लछमन हर्दवाणी यांनी अनुवादीत केलेले चरित्र आहे.तुकोबांच्या १५१
अभंगांचे निरुपण त्यांनी केलेले आहे. तुकोबांचे सिंधीत ब्रेल चरित्र डॉउनलोड करता
उपलब्ध आहे.अभंगरुपी चित्र आहे.
तेलुगु मध्ये भालचंद्र आपटे यांनी अनुवादीत केलेले चरित्र आहे.
कन्नड मध्ये विरुपाक्ष कुळकर्णी यांनी लिहिलेले संक्षिप्त चरित्र आहे.लहान
मुलांकरिता चित्ररुपी अभंग आहे. तुकोबांचे अभंगरुपी लघु कथा आहेत. बहेणाबाई यांचे
अभंग आहेत.
मलयाळम मध्ये विश्वनाथ अय्यर यांनी अनुवादीत केलेले चरित्र आहे.
तमिळ मध्ये शास्तागोपाल यांनी अनुवादीत केलेले चरित्र आहे.
कोंकणी, तमिळ, राजस्थानी आणि कन्नड मध्ये अनुवादीत केलेले चरित्र श्रीधर महाराज
देहूकर यांनी लिहिलेले आहे.
ओडिआ मध्ये खगेश्वर महापात्रा यांनी अनुवादीत केलेले चरित्र आहे.
तेलुगु, ओडिआ आणि मलयाळम मध्ये अनुवादीत केलेले चरित्र भालचंद्र नेमाडे यांनी
साहित्य अकादमी करिता लिहिलेल चरित्र आहे.
बांग्ला मध्ये रविन्द्रनाथ ठाकुर यांनी अनुवादीत केलेले अभंग आहेत. तुकाराम आणि
बंगाल अनुबंधावर लेख आहे. सत्यजीत रे आणि नन्दलाल बोस यांनी रेखाटलेले तुकाराम आहेत.
हिन्दीत महात्मा गांधी यांची राष्ट्रगाथेला लिहिलेली प्रस्तावना आहे. श्रीराम
शिकारखाने व आनंदप्रकाश दीक्षित यांचे अनुवाद आहेत. बाळगोपाळांसाठी चित्ररुपी अभंग
आहे.
संकेतस्थळावर इंग्रजीत - उदय गोखले, एसप्रांतो- अनिरुध्द बनहट्टी, जर्मन - दिलीप
चित्रे व पद्मश्री लोथार लुत्से, फ्रेंच - गी प्वॉत्व्हँ , स्पॅनिश - एल्सा क्रॉस,
डच - लिओ व्हॅन दर झाल्म आणि रशियन - इरिना ग्लुशकोव्हा, अनघा भट व सिरगेइ सेरेयानी
यांचे तुकोबांचे अनुवाद आहेत.
|