|
|
तुकाराम नावाचा
माणूस |
|
संत
तुकारामांचे अभंग,
विठ्ठलभक्ती आणि मुळामधे संतप्रवृत्ती यामुळे मराठी माणसाच्या
मनात खोलवर तुकारामांनी आपली जागा तयार केली आहे. तुकारामांच साहित्य केवळ
विद्यापीठ चौकटीत न अडकता वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून खेडापाडातल्या
जनतेपर्यंत पोचलेलं आहे. रुजलेलं आहे. तुकारामांची अशी प्रतिमा आपल्या मनात असतानाच
आनंदओवरी हे नाटक पाहताना मात्र आपल्याला एक नवा तुकाराम,
जो पूर्वी पाहिला नाही, जाणवला नाही
असा थेट भिडतो. तुकारामांच्या सख्ख्या धाकटा भावाकडून कान्होबा कडून
तुकाराम समजावून घेण ही कल्पनाच रोमांचकारी आहे. तुकारामांच बालपण,
घरातले नातेसंबंध, आयुष्यातले चढउतार,
त्या परिस्थितीत त्यांची झालेली मनोवस्था हे सगळ या नाटकात
अत्यंत तरल पातळीवर आपल्यापुढे उलगडत जातं आणि एक वेगळा तुकाराम आपल्याला भेटतो.
गोष्टींमधून किंवा अभंगातून पाहिलेल्या तुकारामा पेक्षा
हा तुकाराम अधिक प्रेमळ,
अधिक मनस्वी आणि खरं सांगायचं तर एक हाडामासाचा माणूस म्हणून
आपल्यापुढे येतो. |
|
|
आपल्या
अभंगाच्या आणि विठ्ठल भक्तीच्या तंद्रीत घर सोडून कुठेतरी भरकटलेला तुका
शोधण्यासाठी कान्होबा घराबाहेर पडतो आणि इथून नाटकाला सुरुवात होते.
आनंदओवरी ही मूळ कांदबरी दि. बा. मोकाशी यांची तुकारामांच्या घराजवळ जे
विठ्ठलाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या ओवरीला आनंदओवरी म्हणत असत.
या
जागेवर बसून तुकारामांनी अभंग रचले. ही ओवरी तुकारामांच्या आयुष्याची
साक्षीदार आहे. म्हणून कादंबरीच आणि नाटकाच नाव आनंदओवरी नाटकासाठी या
कादंबरीच संकलन विजय तेंडुलकरांनी केल आहे. नाटक एकपात्री असून,
कान्होबाची भूमिका किशोर कदम या सशक्त अभिनेत्याने
अतिशय ताकदीने केली आहे. नाटकामध्ये
प्रकाश
योजना,
नेपथ्य, पार्श्वसंगीत या
बाबींचा उपयोग
चपखलपणे केलेला आहे. कादंबरीच नाटक करण्याची कल्पना या नाटकाचे दिग्दर्शक
अतुल पेठे यांची. प्रयोग मंचस्थ करण्यासाठी त्यांनी घेतलेली अपार मेहनत
नाटक पाहताना लक्षात येते. दिग्दर्शक म्हणून त्यांनी आणखी एक आशयसंपन्न
नाटक प्रेक्षकांपुढे आणलं आहे.
आनंदओवरी
-
मूळ
कांदबरीः दि. बा. मोकाशी
संकलनः
विजय तेंडुलकर
मुख्य
भूमिकाः किशोर कदम |
|
सौजन्य : अनुभव,
जानेवारी
२००३. |
|
|