माऊली आणि तुकोबाराय हे अवघ्या मराठी मनांचे प्राण आहेत. दि. बा. मोकाशी यांनी आनंदओवरी या
कादंबरीत तुकोबारायांचा मनोवेधक शोध घेतला आहे. याच कादंबरीची रंगावृत्ती दिग्दर्शक
अतुल पेठे यांनी रंगमंचावर आणली आहे. अभिजात रंगभूमीने तिचा अतिशय उत्तम प्रयोग
सादर केला आहे. एकपात्री असेच या प्रयोगाचे स्वरूप आहे.
दि. बा. मोकाशींनी मात्र तुकोबांमधला माणूस आणि त्याचा संतत्वाचा प्रवासयांचाच वेध घेतला आहे. तथापि हा
शोध ही सरळ घेतलेला नाही. आनंदओवरी म्हणजे तुकोबांच्या विठ्ठल मंदिरातील ओवरी. याच जागेवर बसून त्यांनी अभंग रचले. ही
ओवरी तुकोबांच्या जीवनातल्या अनेक घटनांची साक्षीदार आहे. तुकोबांचे धाकटे बंधू
कान्होबा नाटकात तुकोबांचा शोध घेत आहेत. नेहमी प्रमाणेच ते हरविल्याची कान्होबांची
भावना होऊन ते तुकोबांना शोधत आहेत. मात्र शोधूनही तुकोबा न सापडल्याने कान्होबांना भावनावेग आवरत नाही.
कान्होबा जिथे जिथे जातात तिथे तुकोबांच्या आठवणी दाटून येतात.
कान्होबा या
शोधात तुकोबांची कहाणीच सांगत राहतात. मात्रती सांगतानाच तुकोबांच्या शोधाचे रूप पालटते. परिवर्तनशील संवेदनशील व कवी वृत्तीच्या भावाचा तीव्र कल्लोळ ते उलगडत
राहतात. इथेच मोकाशींनी तुकोबांमधला माणूस उलगडून दाखविला आहे. तुकोबांच्या
अभंगांचे मूळ काय तुकोबा की विठ्ठल,असा प्रश्न मोकाशी उपस्थित करतात. |