Font Problem

     
 
प्रस्तावना
अभंगगाथा
पक्षी
लघु कथा
अभंगरूपीचित्र
चरित्र
विश्व कोश
पुस्तक
लेख
कविता
भजन श्रवण
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
देहू दर्शन
रंगभूमी
कला दालन
 
पालखी
छत्रपती शिवाजी
 
महात्मा गांधी
 
बाबाजी परांजपे
 
संकेतस्थळाबद्दल
 
मुख्य पान
 
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ

तुकोबांचे वेधक दर्शन

- विश्वास मोरे

 

मराठीजनांच्या भावविश्वाचे अतूट, अविभाज्य अंग असलेले कविश्रेष्ठ तुकोबाराय साहित्य, कविता, चित्रपटांच्या माध्यमातून आजपर्यंत आपण अनुभवले आहेत. कविकुलगुरू तुकोबारायांच्या जीवनाचे अनेकविध पैलू आहेत. त्यापैकी एक वेगळा पदर आनंदओवरी या एकपात्री नाटकातून उलगडून दाखविण्याचा प्रयत्न रंगमंचावर होत आहे. प्रसिध्द साहित्यिक दि. बा. मोकाशी यांच्या आनंदओवरी कांदबरीवर आधारित प्रसिध्द दिग्दर्शक अतुल पेठे यांनी रंगावृत्ती केलेले हे एकपात्री नाटक नुकतेच रंगभूमीवर आले आहे. त्याचा हा रसास्वाद.

        मराठमोळया भाविक भक्तांच्या हृदयात स्थान प्राप्त करणारे तुकोबाराय संसारातून परमार्थ साधत महाराष्ट्रातील भागवत धर्माच्या मंदिराचे कळस बनले. कविश्रेष्ठ तुकोबारायांचा जीवनपट साकारण्याचा प्रयत्न आनंदओवरी या नाटकातून केला गेला आहे. मराठीतील मान्यवर लेखकांमध्ये दि. बा. मोकाशी यांची आनंदओवरी ही कादंबरी सर्वपरिचित आहे. आनंदओवरी म्हणजे तुकोबांच्या श्री क्षेत्र देहू येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील ओवरी; या जागेवर बसून तुकोबारायांनी अभंग रचले. ही ओवरी तुकोबारायांच्या आयुष्याची साक्षीदार आहे. गेल्या चार शतकांच्या कालखंडात तुकोबारायांच्या अभंगांनी नागरांना-ग्रामस्थांना, बुध्दिमंतांना, भाविक परदेशस्थांनाही सारखेच प्रभावित केले आहे. दिशाहीनांबरोबर आंधळेपणाने वाहत जाण तुकोबारायांनी नाकारल. अशा आकाशएवढा तुकोबारायांचे अनेकविध पदर आहेत. ते आतापर्यंत विविध माध्यमांतून समाजासमोर आले आहेत.

आनंदओवरी या नाटकातून तुकोबारायांचे कनिष्ठ बंधू कान्होबा यांनी काही आठवणी सांगितल्या आहेत. तुकोबारायांचे कनिष्ठ बंधू कान्होबा यांनी काही आठवणी सांगितल्या आहेत. तुकोबारायांचे वैकुंठगमन होण्या अगोदर ते देहभान विसरायचे. असेच ते एकदा नेहमीप्रमाणे अचानक कुठेतरी हरवतात. ऐरवी इंद्रायणीकाठी नाही तर त्यांच्या आवडत्या भामनाथ- भंडारा डोंगरावर तरी ते सापडत. मात्र या वेळी शोधाशोध करूनही तुकोबा सापडत नाहीत. त्यामुळे कान्होबाच्या मनात असंख्य शंका येतात. अशी या नाटकाची सुरूवात भावाची काळजी वाहणारा कान्होबा तुकोबांच्या शोधार्थ निघतो. इंद्रायणीतीरी असणाऱ्या बालपणीच्या कातळावर व बैलगाडीच्या जोखडावर बसल्या नंतर कान्होबाच्या मनात तुकोबांविषयीच्या असंख्य आठवणी दाटून येतात. कान्होबा स्वतःशीच अंर्तमुख होऊन विठ्ठलाच्या मागे लागणं म्हणजे काय, तुका कुठं व कसा गेला असेल, तुक्यालाच अभंग कसे सुचतात, असे प्रश्न स्वतःला विचारू लागतो. क्षण दोन क्षण तुकोबांच्या आयुष्यात जाणं अवघड असून तुकोबाने स्विकारलेला मार्ग आपल्याला झेपणार नाही अशी स्वतःचीच समजूतही कान्होबा काढतात. तुकोबांचे अभंगही ते बडबडतात. बालपणीच्या कातळावर बसून तुकोबाराय कविश्रेष्ठ कसे, त्यांचे बालपण, संसारी जीवन कसे होते याविषयी सांगताना त्यांची विठ्ठलभक्ती, स्वभावाविषयी काही उदाहरणं देतात. तुकोबारायांतील संवेदनशील, परिवर्तनशील, बंडखोर कवीची कथाच सांगतात. तुकोबारायांच्या पारदर्शी जीवनाची कथा सांगताना स्वतःचा व कुटुंबाचा वेध घेतात. कान्होबाने केलेल्या शोधाचे प्रश्न श्रोत्यांच्या हृदयालाही स्पर्शतात. त्याद्वारे जगण्याला एक नवी दिशा देतात. नाटकातील कान्होबाची भूमिका किशोर कदम या उमद्या अभिनेत्याने केली आहे. भूमिकेविषयी बोलताना किशोर म्हणाला, आनंदओवरीतील कान्होबाची व्यक्तिरेखा साकार करणं थोडसं अवघडच होतं. मात्र ही भूमिका मी आव्हान म्हणून स्विकारली. इतर कामांतून या भूमिकेसाठी आवर्जून वेळ दिला. त्यामुळे मी या भूमिकेला न्याय देऊ शकलो. शिवाय सलग शंभर मिनीटे अभिनय करणं अवघडच होतं. आव्हानं स्विकारायला आवडत असल्याने मी ही भूमिका स्विकारली.

नाटकाचे दिग्दर्शक व रंगावृत्ती करणारे अतुल पेठे नाटकाविषयी बोलताना म्हणाले, आनंदओवरी तून संत तुकाराम महाराजांची कथा अगदी वेगळया पध्दतीने कथन केली आहे. ते कान्होबांचे आत्मनिवेदन आहे. मूळ कादंबरीतील भाषा अत्यंत तरल आणि उत्कट आहे. ती रंगमंचीत करणे हे अवघड आव्हान होते. या नाटकात आपल्याला निसर्ग भेटतो, उघडे माळ, इंद्रायणी नदीचे पात्र, भंडारा डोंगर, जंगल, जाळी, शेत, देऊळ भेटले. त्याचबरोबर पावसाळा व उन्हाळा असे ऋतूही भेटतात. या सगळया काळातून प्रतित होणारे अवकाश मला नाटक करताना दिसत होते. नेपथ्यातून, संगीतातून व प्रकाश योजनेच्या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. माझ्या आधिच्या नाटकांप्रमाणेच या नाटकातल माणसांच जगण आणि त्यांचे प्रश्न या नाटकातही मला उभे करता आले. त्यात मानवीय उत्कट संबंधाची गहरी छटा अनुभवयाला मिळाली. एका ऐतिहासिक व्यक्तिरेखेचं नातं आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांशी भिडवता आल ते महत्त्वाच. अशा वेळी हे नाटक तुकारामांबाबत बोलत असल तरी आपल्यालाच जगण्याविषयी बोलताना आढळतं.

आनंदओवरी मध्ये तुकोबांचा माणूस म्हणून शोध तर आहेच पण सर्जनशील भावाने घेतलेला भावाचा भावपूर्ण शोध आहे. आकाशाएवढा तुकोबारायाच्या जीवनाचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न या एकपात्री नाटकातून खुबीने केला गेला आहे. रंगमंचावर कान्होबा हे एकच पात्र संवाद साधत असल तरी त्याचा अनेक पात्रांशी संवाद होतो. किशोरची या नाटकातील गोळीबंद संवादफेक हृदयाला भिडते. विशेष म्हणजे सलग शंभर मिनीटे कान्होबा स्वतःशी आणि प्रेक्षकांशी संवाद साधत असल्याने आजच्या अन्य नाटकांच्या तुलनेत हे नाटक आपला ठसा निश्चितच उमटवत. जिवंत संगीतामुळे प्रयोगाला वेगळीच उंची प्राप्त होते.

       मूळ संहितेच संकलन ज्येष्ठ नाटककार विजय तेंडूलकर यांनी केल असून अतुल पेठे यांनी रंगावृत्ती तयार केली आहे. दिग्दर्शन व संगीत संकल्पनाही त्यांचीच आहे. मकरंद साठे यांच नेपथ्य आणि अशोक गायकवाड यांच संगीत प्रभावी आहे . श्रीकांत एकबोटे यांनी प्रकाश योजनेचा चपखल वापर केला आहे. वेशभूषेने कान्होबा जिवंत करण्याचा प्रयत्न शाम भूतकर यांनी केला आहे. पुण्याच्या अभिजात रंगभूमी या संस्थेने या नाटकाचा उत्तम प्रयोग सादर केला आहे.

सौजन्य : लोकमत - चित्रगंधा १६,जानेवारी, २००३.